मातृमंदिर देवरुख या सामाजिक क्षेत्रात काम करणार्या संस्थेच्या कार्याची दखल घेत दि ७ सप्टेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र टाईम्स ( मातृमायेची सावली) आणि त्या पाठोपाठ आज दि. १३ सप्टेंबर २०२१ रोजी लोकसत्ता मधील सर्वकार्येषु सर्वदा या विशेष भागात ( आरोग्य सेवेचा वसा) जी अभूतपूर्व प्रसिध्दी मिळाली आणि सार्या महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात मातृमंदिरचे सेवाभावी काम, इंदिराबाई मावशी हळबे यांचे योगदान आणि राष्ट्र सेवादलाच्या पुरेगामी विचारांच्या रचनात्मक कार्याची अनुभूती आणि प्रेरणा पेहोचविल्याबद्गल या महाराष्ट्रातील दोन अग्रणी वृत्तपत्र त्यांचे संपादक, संपादक मंडळ आणि प्रतिनिधी यांचा मातृमंदिरचा कार्याध्यक्ष म्हणून अंत:करणापासून ऋणी आहे.
या संस्थेच्या उभारणीतील हळबे मावशी यांचे अभूतपूर्व योगदान हे महाराष्ट्र आणि देशातील अनेक कार्यकर्ते आणि संस्थाचा प्रेरणा स्त्रोत आहे. कोकणातील हजारो निराश्रीत मुले, स्रीया, उपेक्षित , वंचीत घटकाला निवारा, आरोग्य, शिक्षण, स्वावलंबन सुविधा आणि जगण्याचे आत्मभान देणार्या या माऊलीची संस्था आज अधिक व्यापक, विस्तारीत आणि पुढील लाखोंचा आरोग्य, शिक्षणाच्य आधार व्हावी हाच आम्हा नव्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न आहेत. यातूनच कोविड सेंटर , चिपळूण पूरग्रस्त मदत, सर्वे आदि व्यापक उपक्रम राबविले जातात. आज २१ व्या शतकाची गरज आहे. कोकणात अद्ययावत चॅरीटेबल रुग्णालयाची. कोविड नंतर कोकणात स्थायिक होणारे प्रमाण विलक्षण वाढले आहे. येथील महामार्ग १० वर्ष झाली तरी खड्यातून बाहेर येत नाही. आरोग्य सुविधा तर त्यापेक्षा भीषण आहे. मातृमंदिर त्यासाठी उत्तम अद्ययावत आरोग्य सेवेचा पर्याय घेऊन येत आहे.
लोकसत्ताने याचवेळात या संस्थेची निवड करत संस्थेला मोठ्या प्रमाणावर निधी देण्याचे आवाहन सार्या महाराष्ट्राला केले आहे. ही फार महत्वाची बाब आहे. या आवाहनाला लोक भरभरून प्रतिसाद देतील आणि कोकणातील अद्ययावत सुपर स्पेशालिटी हॅास्पिटॅलिटीचे स्वप्न साकार करतील याची खात्री आहे.