मातृमंदिर देवरुख या संस्थेची स्थापना १ जानेवारी १९५४ साली कै. इंदिराबाई हळबे यांनी केली. मातृमंदिरच्या मुख्य हेतूमध्ये स्त्रिया आणि मुलांचा सर्वांगीण विकास हा होता. आरोग्य सेवेनंतर लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी बालवाडी सुरु करून त्यांनी बालविकास कामाची मुहूर्तमेढ रोवली.

मातृमंदिरची बालवाडी १९५६ साली कै. इंदिराबाई हळबे यांनी सुरु केली. तेव्हा सौ. पत्कीबाई आणि मावशी हळबे यांची भेट झाली. भेटीत मुलांच्या संस्काराबाबत व शिक्षणाबाबत चर्चा झाली. त्यातूनच ‘प्रसाद बालक मंदिर’ चे काम सुरु झाले.

त्यावेळी बालवाडीचे वैशिष्ट्य म्हणजे मुलांना संस्थेच्या बैलगाडीतून आणणे व पोहोचवणे अशा प्रकारे व्यवस्था करण्यात आली होती. मुले आनंदाने बालवाडीत येत होती. मुले बैलगाडीची वाट पाहत असायची.

सुरुवातीला हे बालक मंदिर राजवाड्यांच्या जागेत भरायची नंतर संस्थेच्या गोकुळ इमारतीत भरू लागली. आजही प्रसाद बालक मंदिर गोकुळाच्या इमारतीत चालू आहे. आता मात्र पालक स्वतः मुलांना सोडतात व नेण्यास येतात. मुलांना खेळण्यासाठी सी-सॉ, घसरगुंडी, झोपाळे अत्याधुनिक क्रीडासाहित्य आजही उपलब्घ आहे. त्या क्रीडासाहित्यचा मुले पुरेपूर वापर करतात. वर्ग खोल्याही प्रसस्त आहेत. तसेच मुलांकडून घडीकाम, चिकटकाम. चित्रकाम, रंगकाम, ठसेकाम, मातीकाम, कोलाजकाम हे क्रियाकलाप करून घेतले जातात. त्यामुळे मुलांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि सामाजिक विकास साधला जातो.