जिल्ह्यातील दुग्धत्पादन क्षेत्राला दिशा देणाऱ्या मातृमंदिरच्या डेयरी डिप्लोमाचे उदघाटन…
वाशिष्टी दूध प्रकल्प व मातृमंदिर दुग्धत्पादन क्षेत्रातील नव्या प्रयोगांसाठी एकत्रित डेमो प्रोजेक्ट उभारणार…
मागील 70 वर्ष आरोग्य, शिक्षण, महिला व बालविकास, कृषी व ग्रामीण विकासाचे अनेकविध उपक्रम राबवून जिल्ह्यातील जनमानसात महत्वाचे स्थान निर्माण केलेल्या ‘मातृमंदिर देवरुख ‘ संस्थेचा जिल्ह्यातील पहिला डेयरी डिप्लोमाचे आज उदघाटन झाले.
जिल्ह्याची गरज ओळखून मागील 3 वर्ष प्रयत्न करून मिळवलेल्या या विद्यालयाच्या मान्यते बाबत केलेली धडपड व भविष्यातील योजनाबाबत मातृमंदिर संस्थेचे कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये यांनी आपल्या प्रस्ताविकात मांडले.
शेतीपूरक व्यवसायामध्ये सर्वात शाश्वत असलेल्या दुग्धउत्पादन याविषयी जिल्ह्याची गरज ओळखुन यासाठी लागणारी प्रशिक्षित मॅन पावर निर्माण करू शकणारा कोर्स मातृमंदिर सुरु करत आहे याबाबत सर्वांनी याप्रसंगी समाधान व्यक्त केले. वाशिष्टी मिल्क प्रोजेक्ट्स चे प्रशांत यादव यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील दुग्धत्पादन क्षेत्राचा योग्य आकडेवारीसह आढावा घेत भविष्यातील निर्माण होऊ घातलेल्या प्रचंड संधी बाबत माहिती दिली. नागपूर माफसू विद्यापीठ व मातृमंदिर यांच्यामधील खऱ्या अर्थाने दुवा असलेले डॉ केतन चौधरी यांनी लंम्पि रोगाच्या वेळच्या अपुऱ्या पडलेल्या प्रशिक्षित मॅन पावर चा दाखला देत सध्यस्थितीत ग्रामीण भागातील या क्षेत्राच्या विकासासाठी मातृमंदिरचा हा नवीन प्रकल्प महत्वाचा राहील असं मांडल.
पुढील वर्षांपासून बारावी सायन्स च्या बेसवर ऍडमिशन सुरु होणारा हा कोर्स 2 ऐवजी 3 वर्षांचा होणार आहे. त्यामुळे मातृमंदिर च्या या कोर्सच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागातील युवकांना रोजगार व नोकरीच्या संधी अधिक ज्यास्त प्रमाणात उपलब्ध होऊ शकतील. पुढील काळात या क्षेत्रातील जिल्ह्यातील सर्व घाटंकांना मातृमंदिर सोबत जोडून घेत तरुणांचे मोठ्या शहराकडे होणारे फोर्सफुल स्थलांतर कमी करण्याचा संस्थेचा प्रयत्न राहील.
महाराष्ट्रभरातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात रत्नागिरी फिशरीस कॉलेजचे डॉ केतन चौधरी, वाशिष्टी मिल्क प्रॉडकट्स प्रा ली. चे प्रशांत यादव, देवरुख येथील जेष्ठ पशुवैद्यकीय डॉक्टर डॉ. शेख, ओझरे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रवीण टक्के, मातृमंदिर चे कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये आणि उपाध्यक्ष विलास कोळपे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.
याप्रसंगी रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक तज्ञ् मान्यवर या महत्वाच्या क्षणांचे साक्षीदार झाले. यामध्ये जिल्ह्यातील प्रथितयश व्हेटरनरी डॉक्टर डॉ भागवत, डॉ. मोहिते, देवरुख सर्कल अधिकारी सुधीर यादव, पर्यावरण कार्यकर्ता पंकज दळवी, मातृमंदिर संस्थेचे सेक्रेटरी विनय पानवलकर, कोषाध्यक्ष अनिल आणेराव, संचालक संतोष शेट्ये, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते युयूत्सु आर्ते, नितीन लोकम, मनोहर माने, रेवा कदम, शीतल पंडित ई अनेक मान्यवर उपस्थित होते.